चक्रीवादळाची सिस्टीम श्रीलंकेजवळ सक्रिय, उत्तरेकडे सरकताना तीव्रता वाढेल; बहुतांश भागात थंडी कायम.
सध्या ‘दितवाह’ (Ditwah) चक्रीवादळाची सिस्टीम श्रीलंकेच्या भागामध्ये सक्रिय आहे. ही प्रणाली सध्या जमिनीवर असल्याने त्याला जास्त बळकटी मिळत नाहीये आणि कोरडे वारे पोहोचत असल्याने ढगाळ वातावरण थोडेसे कमी झाले आहे. मात्र, या वादळामुळे श्रीलंकेत खूप मुसळधार पाऊस झाला आहे. ही सिस्टीम आता उत्तरेकडे सरकत आहे आणि पुन्हा समुद्रात आल्यावर त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
हे चक्रीवादळ उत्तरेकडे जात असताना, ३० नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत ते डीप डिप्रेशन किंवा डिप्रेशन म्हणून चेन्नईच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, या चक्रीवादळाचा आपल्या महाराष्ट्रावरती सध्या तरी कोणताही विशेष प्रभाव नाही.
















