सुरक्षा मानकांची अंमलबजावणी सुरू; दुचाकीसाठी ₹५३१ आणि चारचाकीसाठी ₹८७९ शुल्क भरून ऑनलाईन अपॉइंटमेंट कशी घ्यायची?
HSRP नंबर प्लेट बसवणे बंधनकारक
महाराष्ट्रातील सर्व वाहनधारकांसाठी आता ‘एचएसआरपी’ (HSRP- High-Security Registration Plate) नंबर प्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही सुरक्षा मानके असलेली नंबर प्लेट लवकरात लवकर बसवून घेणे आवश्यक आहे, कारण यासाठी फार कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. हा महत्त्वाचा नियम पूर्ण न केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते. हा दंड टाळण्यासाठी, वाहनधारकांनी तातडीने ऑनलाईन बुकिंग प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
ऑनलाईन बुकिंग प्रक्रियेची सुरुवात
एचएसआरपी नंबर प्लेटची ऑनलाईन बुकिंग सुरू करण्यासाठी, सर्वप्रथम ‘ट्रान्सपोर्ट एचएसआरपी’ (Transport HSRP) असे गुगलवर सर्च करून महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत ट्रान्सपोर्ट वेबसाइटवर जावे लागते. वेबसाइट उघडल्यानंतर ‘सिलेक्ट ऑफिस’ वर क्लिक करून आपल्या वाहनाच्या नोंदणी क्रमांकाशी (उदा. MH-XX) संबंधित असलेले आरटीओ (RTO) कार्यालय निवडावे लागते. कार्यालय निवडल्यानंतर ‘ऑर्डर नाऊ’ या पर्यायावर क्लिक करावे आणि पुढील टप्प्यात ‘डीलर प्रिमासेस’ हे फिटमेंट लोकेशन निवडून, जुन्या वाहनांसाठी ‘कम्प्लीट एचएसआरपी किट’ हा पर्याय निवडावा.
















