अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
Read More
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
Read More
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
Read More
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
Read More
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
Read More

कृषी अवजारे अनुदान योजना: २४ लाख अनुदान; शेतकऱ्यांसाठी कृषी अवजार बँक स्थापनेची मोठी संधी

पोकरा २.० (NDKSP) अंतर्गत ७२०० हून अधिक गावांमध्ये योजना; एफपीसी आणि महिला बचत गटांना ६०% पर्यंत अनुदान

राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी यांत्रिकीकरण सहज शक्य व्हावे, या उद्देशाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा २.०) टप्पा दोन अंतर्गत ‘कृषी अवजार बँक अनुदान योजना’ राबवली जात आहे. ही योजना राज्यातील २१ जिल्ह्यांमधील ७२०० हून अधिक गावांमध्ये सक्रिय आहे. अनेक लहान शेतकऱ्यांसाठी स्वतः ट्रॅक्टर किंवा मोठी अवजारे खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते. अशावेळी, कृषी अवजार बँकेच्या माध्यमातून अवजारांचा सामूहिक वापर केल्यास शेतकऱ्यांचा खर्च वाचतो आणि अवजार बँक चालवणाऱ्या गटाला एक चांगला रोजगार मिळतो.

ADS किंमत पहा ×

अनुदान मर्यादा आणि पात्र लाभार्थी

या योजनेअंतर्गत कृषी अवजार बँकेच्या स्थापनेसाठी कमाल ४० लाख रुपयांपर्यंतच्या प्रकल्प खर्चावर ६०% पर्यंत अनुदान दिले जाते, म्हणजेच लाभार्थी गट जास्तीत जास्त २४ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळवू शकतात. या योजनेसाठी शेतकरी उत्पादक कंपन्या (FPC), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (MSRLM) पुरस्कृत महिला बचत गट आणि ग्राम संघटना (VWS) हे लाभार्थी म्हणून पात्र आहेत.

Leave a Comment