अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
Read More
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
Read More
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
Read More
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
Read More
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
Read More

शासनाच्या हलगर्जीपणामुळे सोयाबीन खरेदी केंद्र बंद; पूर्णा तालुक्यात १४०० शेतकरी हवालदिल

पांगरा रोडवरील केंद्र चार दिवसांपासून ठप्प; पणन महासंघाकडून ‘बारदान लेबल’ न मिळाल्याने ऑनलाइन नोंदणी केलेले शेतकरी अडचणीत.

आवश्यक लेबलअभावी खरेदी केंद्र बंद

पूर्णा तालुका खरेदी विक्री संघाच्या अंतर्गत नुकतीच ऑनलाइन नोंदणीकृत शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी सुरू करण्यात आली होती. मात्र, पांगरा रोडवरील समर्थ कृषी बाजार मार्केटमधील शासकीय आधारभूत किंमतीवर सुरू असलेले हे खरेदी केंद्र काही दिवस सुरू झाल्यावर बंद पडले आहे. जिल्हा पणन मंडळाकडून खरेदी केलेल्या सोयाबीनच्या बारदान पोत्याला आवश्यक नोंदणी लेबल (बारदान लेबल) उपलब्ध न झाल्यामुळे हे केंद्र गेले चार दिवसांपासून बंद आहे. परिणामी, ऑनलाइन नोंदणी करून चांगल्या दराची अपेक्षा बाळगणारे सुमारे १४०० शेतकरी हवालदील झाले आहेत.

ADS किंमत पहा ×

बंपर नुकसानीनंतर हमीदराची आशा

यंदा खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे उरलेली पिकेही खराब झाली, परिणामी उत्पादन सुमारे ५० टक्क्यांहून अधिक कमी झाले असून प्रति एकरी केवळ २ ते ३ क्विंटल पीक मिळाले आहे. कर्जाच्या ताणाखाली असलेल्या शेतकऱ्यांनी आपले उत्पादन वाचवून चांगला दर मिळावा म्हणून, ५३२८ रुपये प्रति क्विंटल दरासाठी शासकीय हमीदर केंद्रावर ऑनलाइन नोंदणी केली आहे. आतापर्यंत १४०० हून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली असूनही केंद्र बंद पडल्याने शेतकरी बाजारात अडकले आहेत.

Leave a Comment