स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू; गरजू कुटुंबांना मिळणार थेट लाभ.
ग्रामीण भागातील ज्या कुटुंबांकडे अद्याप शौचालय नाही, त्यांच्यासाठी केंद्र सरकारने ‘स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)’ अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, पात्र लाभार्थ्यांना शौचालय बांधण्यासाठी १२,००० रुपयांचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. या योजनेसाठी आता नागरिक घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकतात.
योजनेसाठी कोण पात्र आहे?
स्वच्छ भारत अभियानाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, खालील कुटुंबे या योजनेसाठी पात्र आहेत:
- दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबे.
- अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील कुटुंबे.
- अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी.
- भूमिहीन मजूर.
- शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्ती असलेले कुटुंब.
- महिला कुटुंबप्रमुख असलेले कुटुंब.
- ज्यांच्याकडे स्वतःचे शौचालय नाही आणि ज्यांनी यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून शौचालयासाठी अनुदान घेतलेले नाही, अशी सर्व कुटुंबे.
ऑनलाइन अर्ज कसा करावा? (स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया)
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाइल किंवा कॉम्प्युटरवरून खालीलप्रमाणे अर्ज करू शकता:
१. नोंदणी (Registration):
-
सर्वप्रथम स्वच्छ भारत मिशनच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: sbm.gov.in/sbm_dbt/secure/login.aspx
-
येथे ‘Citizen Registration‘ या बटणावर क्लिक करा.
-
तुमचा मोबाईल क्रमांक, नाव (आधार कार्डप्रमाणे), लिंग, पत्ता, राज्य आणि कॅप्चा कोड टाकून ‘Submit’ करा.
-
तुमची नोंदणी यशस्वी झाल्याचा मेसेज दिसेल.
२. लॉगिन (Login):
३. नवीन अर्ज भरणे (Filling the New Application):
-
लॉगिन झाल्यावर, डाव्या बाजूला असलेल्या मेन्यूमधील ‘New Application‘ या पर्यायावर क्लिक करा.
-
तुमच्यासमोर अर्ज उघडेल. यामध्ये खालील माहिती अचूक भरा:
-
पत्ता: राज्य, जिल्हा, तालुका (Block), ग्रामपंचायत आणि गावाचे नाव निवडा.
-
अर्जदाराची माहिती: अर्जदाराचे नाव (आधार कार्डनुसार) आणि आधार क्रमांक टाका. त्यानंतर चेकबॉक्सवर टिक करून ‘Verify Aadhaar No‘ या बटणावर क्लिक करून आधार प्रमाणित करा.
-
इतर तपशील: वडिलांचे किंवा पतीचे नाव, लिंग, प्रवर्ग (Category – APL/BPL), उप-प्रवर्ग (Sub-Category – SC/ST/Small Farmer इ.), कार्ड प्रकार (Aadhaar Card निवडा) आणि आधार क्रमांक टाका.
-
बँक तपशील: तुमच्या बँकेचा IFSC कोड अचूक टाका. कोड टाकल्यावर बँकेचे नाव, शाखेचा पत्ता इत्यादी माहिती आपोआप भरली जाईल. त्यानंतर तुमचा बँक खाते क्रमांक दोन वेळा टाका.
-
पासबुक अपलोड: तुमच्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाचा स्पष्ट फोटो (PDF/JPEG/PNG फॉरमॅटमध्ये आणि 200 KB पेक्षा कमी आकारात) ‘Choose File‘ वर क्लिक करून अपलोड करा.
४. अर्ज सबमिट करणे:
अर्ज केल्यानंतर पुढे काय होते?
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तुमचा अर्ज पुढील पडताळणीसाठी जातो. तुम्ही ‘View Application‘ या पर्यायावर क्लिक करून तुमच्या अर्जाची सद्यस्थिती (Status) तपासू शकता. स्थानिक पातळीवर ग्रामसेवक किंवा संबंधित अधिकारी तुमच्या अर्जाची आणि जागेची पाहणी करतात. त्यानंतर बांधकामाच्या प्रगतीनुसार जिओ-टॅगिंग करून अनुदानाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते.